Loading
आपली संस्कृती आणि संत परंपरेचा वारसा असलेली ही महाराष्ट्रची भूमीमध्ये हरिनाम जपण्याचे काम मुंबई मधील रेल्वे प्रवासीही करत आहेत. रेल्वे मधील भजन अविरत सुरु रहावीत म्हणून कै. राजेंद्र जोशी,श्री. शिवाजी पाटील, श्री. जयराम पवार, श्री. वसंत प्रभू, श्री. जनार्दन धयाळकर, श्री. बाळकृष्ण मोरे यांच्या नेतृत्वाखाली सन २००७ साली श्री. संत सेवा समिती स्थापन करण्यात आली. पश्चिम रेल्वे प्रवासात चालणारी सर्व भजने एकत्र आणून त्यांना एक नवीन व्यासपीठ तयार करुन देण्यात आले. रेल्वेमधील भजने अविरत सुरू रहावीत याकरता संस्था अथक प्रयल्न करीत आहे. यामध्ये महाराष्ट्र तसेच विविध राज्याच्या काना कोपर्यातून, प्रत्येक तालुक्यातून मुंबई व उपनगरात नोकरी निमित्ताने आलेले सर्व भाविक, वारकरी यांना गोळा करुन १२४ भजन मंडळाची माळ पश्चिम विभागमध्ये गुंफली गेली आहे ह्याचा आम्हाला अभिमान आहे. भजने चालू ठेवण्यासाठी अगदी दिल्लीपर्यंत अनेक माऊलींनी प्रयत्न केले. भजन चालू असताना अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्या अडचणीतून मार्ग काढून आणि रेल्वेतील सहप्रवाशांची काळजी घेवून भजने चालू ढेवणयासाठी श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था अहोरात्र कार्य करीत आहे. संस्थेमार्फत रेल्वे अपघात झालेल्या व्यक्तीला तातडीने रक्ताची मदत व्हावी म्हणून दरवर्षी महारक्तदान शिबीर आयोजन केले जाते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम केले जाते, गरजू व्यक्तींना वैद्यकीय मदत, नवीन पिढीमध्ये सांस्कृतिक महत्व वाढवण्यासाठी गुडीपाडव्याला नववर्ष स्वागत दिंडी, मुंबई आणि उपनगरातील वारकरी मंडळी करीता चर्चगेट येथे आषाढी एकादशी दिंडी महासोहळा आयोजन यामध्ये हजारोंच्या संख्येने प्रवासी आणि वारकरी सहभागी होतात, नैसर्गिक आपत्तीमध्ये पूरग्रस्तांना आर्थिक मदत, राष्ट्रीय आपत्तीमधे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक सहकार्य. कोरोनाच्या काळामध्ये गरजू कुडुंबाना अन्नधान्य वाटप, रेल्वे प्लॅटफॉर्म वरील स्वच्छता मोहीम, शिक्षणाचे महत्व जाणून दहावी आणि बारावीच्या विद्याथ्यींना शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते असे विविध नाविण्यपूर्ण सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करुन समाज जागृत करण्याचे निरंतर कार्य संस्था करत आहे. तसेच पश्चिम विभागामध्ये विविध भाषिक अनेक तरुण गायक मंडळी नावारुपास येण्यास संस्थेचा मोठा वाटा आहे. सामाजिक बांधिलकी आणि संस्कृती जपण्यासाठी आपण ही या संस्थेसोबत जोडून घ्यावे असे या निमित्ताने सांगावे वाटते.